Sunday , September 20 2026
Breaking News

रणझुंझार चौक, निलजी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : रणझुंझार चौक, निलजी येथे रणझुंझार परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लक्ष्मण सिद्राय गोमानाचे व निर्मला गोमानाचे या दांपत्याच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व आदर्शांचा गौरव करत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास रणझुंझार परिवारातील सदस्य निखिल मोदगेकर, सिद्राय वर्पे, कल्लाप्पा कोलकार, गुंडू पाटील, परशराम पाटील, महेश मोदगेकर, अमर मोदगेकर, कल्लाप्पा सुनगार, कपिल पाटील, नारायण अक्षीमनी, भरमा पाटील व गावातील इतर नागरिक उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रणझुंझार परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *