Sunday , September 20 2026
Breaking News

महापुरुषांचे विचार हाच परिवर्तनाचा राजमार्ग : डॉ. राजश्री तुडयेकर

Spread the love

 

कराड (प्रतिनिधी) : कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारक मध्ये स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच संवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम यथा सांग संपन्न झाला. या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती च्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजश्री ऍग्रिवेंचर कंपनीच्या एम. डी. डॉ. राजश्री तुडयेकर या अध्यक्षीय भाषण करताना म्हणाल्या, महापुरुषांचे विचार हाच खरा परिवर्तनाचा राजमार्ग आहे. या देशाला तारून देणारे विचार हे फक्त महापुरुषच देऊ शकतात आणि त्यांनी दिलेला विचारांचा वारसा जपण्याचे काम हे स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन करत आहे. कार्यक्रमात समतावादी महासंघाचे संस्थापक डॉक्टर विजय चांदणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास प्राध्यापक बोडरे सर, तसेच प्रवीण भोसले, विद्याधर गायकवाड खास आकर्षण म्हणून रुबाब चित्रपटातील सह अभिनेत्री प्रतीक्षा जाधव तसेच मीरा चित्रपटातील कलाकार वैष्णवी काळे, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम गुरव, राज्य सल्लागार सुनील फाटक राज्य उपाध्यक्ष प्रतिश चोपडे जिल्हाध्यक्ष प्रकाश दणाणे, विजया माने, अनिल पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध विचारधारेत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये कला क्रीडा कृषी सामाजिक वैद्यकीय अशा अनेक पुरस्कारांचा समावेश होता कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सल्लागार सुनील फाटक यांनी आभार व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *