खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी समस्येच्या चर्चेत असते. कधी गटारीची समस्या, तर कधी पथदिपाची समस्या, कधी पाण्याची समस्या अशा अनेक समस्या खानापूर शहरासह येथील रहिवाशांना सतावत आहेत.
नुकताच खानापूर शहरातील पणजी-बेळगांव महामार्गावरील रस्त्याचे पॅचवर्क करण्यास प्रारंभ केला आहे.
खानापूर शहरातील फिश मार्केटपासून ते हलकर्णी गावच्या वेशीपर्यंत पॅचवर्कचे काम सुरू करण्यात आले.
संबंधित खात्याने केवळ खड्ड्यामध्ये दगडी डस्ट फेकून हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. तर कामगार खड्ड्यात केवळ फावड्याने लेवल करून पुढे जात आहेत. हे काम करत असताना खानापूरचे नागरिक त्या कामाकडे डोळे झाक करून न बघितल्याचा बाहणा करून जात आहेत. खानापूर शहरातील कोण एका नागरिकाने हे पॅचवर्क निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे पॅचवर्क थांबवा. उत्कृष्ट दर्जाचे काम करणार असाल तर करा? नाहीतर काम बंद अशी तक्रार कोणत्याही लोकप्रतिनिधी, नेत्यानी, किंवा जाणकारांनी केली नाही.
ही खानापूर शहरातील नागरिकांची मनस्थिती आहे. त्यामुळे खानापूर शहराचा विकास थांबला आहे. एका अधिकारी वर्गालाही कशाचीही भिती नाही. त्यामुळे खानापूर शहर विकासापासून दुर गेला आहे.
संबधित कंत्राटदार मात्र निकृष्ट दर्जाचे काम करून आपला फायदा करून घेत आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे.
