बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त आज सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील अंजनी गावामधील महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या ‘निर्मळ स्थळ’ या स्मृतीस्थळी भेट देऊन आबांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले
यावेळी आबांचे सुपुत्र व तासगावचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांची भेट घेतली. यावेळी आबांच्या बेळगाव भेटीच्या आणि सीमाप्रश्नी तळमळीबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. अजूनही सीमावासीयांच्या मनात आबा स्थान करून आहेत आणि आबा सदैव स्मरणात राहतील असे युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले.
यावेळी युवा समिती उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, राजू कदम, प्रवीण रेडेकर, सिद्धार्थ चौगुले, प्रतीक पाटील, जोतिबा पाटील आदी उपस्थित होते.