बेळगाव : हुंचेनहट्टी (ता. जि. बेळगाव) येथील श्री संत सांप्रदायिक वारकरी एकता संघातर्फे या महिन्याअखेर आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा मुहूर्तमेढ कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
हुंचेनहट्टी येथील मराठी कन्नड प्राथमिक शाळेच्या मैदानावर येत्या दि. 26 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा मुहूर्तमेढ रोपण कार्यक्रम काल सोमवारी उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवनेरी सोसायटी बेळगुंदीचे संचालक पुंडलिक जाधव, बिजगर्णीचे सरकारी कंत्राटदार मनोहर पाटील आणि बेळगाव भाजी मार्केटमधील अडत व्यापारी सचिन पुंडलिक जाधव हे उपस्थित होते. यावेळी झेंड्याचे पूजन मनोहर पाटील आणि मुहूर्तमेढ पूजन पुंडलिक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सचिन जाधव यांच्या हस्ते श्रीफळं वाढवून आरती करण्यात आली.
पाहुण्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आल्यानंतर पुंडलिक जाधव यांचा सत्कार पिरनवाडीचे माजी ग्रा. पं. उपाध्यक्ष वसंत ताबुळगुडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे मनोहर पाटील यांचाही सत्कार वसंत ताबुळगुडे यांच्या हस्ते करण्यात आला. पाहुण्यांचा श्रीफळ देऊन मानपान करताना सचिन जाधव यांना पप्पू शंकर बर्डे यांच्या हस्ते तसेच रमेश मजुकर यांच्या हस्ते मनोहर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पुंडलिक जाधव यांचा सत्कार बिटाप्पा नागप्पा तारियाळ यांच्या हस्ते झाले. पुंडलिक जाधव यांनी यावेळी समयोचित विचार व्यक्त करताना भक्तिमार्गाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक बस्तवाडकर यांनी केले. कार्यक्रमास बारकू मोरे, पाकू भोजुडेकर, गुडू खोत, रमेश मजूकर आदींसह गावातील वारकरी मंडळी आणि महिला भाविक उपस्थित होत्या.
Check Also
बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
Spread the love पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण …