खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर गावच्या प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या नुतन इमारत व गोडाऊनचा काॅलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. या इमारतीसाठी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ३० लाखाचा निधी मंजुर कामाचा शुभारंभ केला.
यावेळी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्याहस्ते काॅलम भरणी कामाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी कृषी पत्तीन सोसायटीचे चेअरमन कृष्णकांत बिर्जे ययांच्याहस्ते पुजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला संदर्भ रामचंद्र नाकाडी, गणपती सावंत, नामदेव नाकाडी, पुंडलिक पाटील, दामोदर नाकाडी, गंगाराम बावदाणे, सिध्दराम जांबोटी, सुमन गोवेकर, जनाबाई राजगोळकर भागधारक, शेतकरी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …