Saturday , July 27 2024
Breaking News

खानापूर तालुक्यात २२०६० पोलिओ डोसचे उद्दिष्ट

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे आरोग्य खात्याच्यावतीने यंदाही ० ते ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस रविवार दि. २७ रोजी देण्यात येणार आहे.
यामध्ये ग्रामिण भागात तीन दिवस पोलिओ डोस तर शहरात चार दिवस पोलिओ डोस देण्यात येणार आहे.
पोलिओ डोसचा शुभारंभ रविवारी दि. २७ रोजी सकाळी आठ वाजता होईल. यावेळी कार्यक्रमाला शहरातील नगराध्यक्ष, नगरसेवक, तहलीसदार, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागात ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य, तालुका पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, पीडीओ अधिकारी, अंगणवाडी शिक्षिका, आया आदी उपस्थित राहणार आहेत.
खानापूर तालुक्यातील पीएचसी सेंटरमध्ये पुढील प्रमाणे बालकाना पोलिओ डोस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
अशोक नगर पीएचसी सेंटरमध्ये १४१६ बालके, बिडी पीएचसी सेंटरमध्ये २१८१ बालके, गणेबैल पीएचसी सेंटरमध्ये २४३८ बालके, हलशी पीएचसी सेंटरमध्ये १२७५ बालके, इटगी पीएचसी सेंटरमध्ये २५१५ बालके, कक्केरी पीएचसी सेंटरमध्ये २४६७ बालके, कणकुंबी २११५ बालके, लोंढा पीएचसी सेंटरमध्ये १३५५ बालके, नंदगड पीएचसी सेंटरमध्ये १५१२ बालके, पारिश्वाड पीएचसी सेंटरमध्ये ३२८७ बालके तर खानापूर शहरात १४९९ बालकाना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे.
पोलिओ डोस कार्यक्रमाला ६५० डाॅक्टर, ४२ सुपरवायझर, आदीची नेमणूक करण्यात आली आहे.
दुसऱ्या दिवशी पासून घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्यात येणार आहे. तर बसस्थान, रेल्वेस्थानकांवर तसेच ग्रामीण भागातील वीटभट्टीमजूरांच्या झोपडीपर्यंत पोलिओ डोस देण्याची सोय करण्यात आली आहे.
तेव्हा तालुक्यातील ० ते ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकाना न चुकता पोलिओ डोस घेण्यात यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजीव नांद्रे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *