खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव- लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण काम युध्दपातळीवर सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील असोगा रेल्वे गेटचे काम गेल्या शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून असोगा रेल्वेगेट बंदच त्यामुळे असोगा परिसरातील मन्सापूर, बाचोळी, कुन्टीनोनगर, त्याचबरोबर मणतुर्गा, नेरसा भागातील नागरिकांचे तसेच दुचाकी वाहनधारकांचे व ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनधारकांना असोगा रेल्वे गेट बंद असल्याने खानापूर बेळगांवला ये-जा करणे कठीण होत आहे.
यासाठी संबंधित खात्याचे अभियंते शशिधर यांनी ८ दिवसात असोगा रेल्वेगेट वाहतुकीस मोकळे करून देतो. असे सांगुनही अजून असोगा रेल्वेगेट बंदच आहे. यामुळे या भागातील जनतेचे हाल होत आहेत.
तेव्हा लवकरात लवकर असोगा रेल्वेगेट वाहतुकीस मोकळे करावे. असोगा परिसरातील जनतेचे हाल दुर करावे, अशी मागणी नागरिकांतून तसेच वाहनधारकांतून होत आहे.
