खानापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन खानापूर तालुका विकास आघाडी स्थापना निमित्ताने पत्रकार परिषद खानापूर शहरातील शिवस्मारक येथील सभागृहात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष भरमाणी कल्लापा पाटील होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर तालुक्यात परकीयांचे आक्रमण होऊन राजकरण दुषीत झाले आहे. तालुक्यातील सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार वाढला आहे. गरीब जनतेची सरकारी अधिकारी लुट करत आहे. सामान्याना न्याय मिळत नाही.
तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालय दलाल वाढले आहेत. विधवा पेन्शन, वृध्दापवेतन, इतर सवलतीच्या कामासाठी हजार रूपायाची मागणी होत आहे.
यावर कुठे तरी अंकुश ठेवण्यासाठी खानापूर तालुका विकास आघाडीची स्थापना करण्यात येत आहे, असे विचार संस्थापक अध्यक्ष भरमाणी कल्लापा पाटील यानी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, तालुक्याचा विकास झाला ही एक अफवा प्रत्यक्षात तालुक्यातील रस्ते, बससेवा, वीजपुरवठा याची गावोगावी बोंब सुरू आहे. याची जाणीव जनतेला करून देण्यासाठी कुणीतरी पुढे सरसावले पाहिजे, असे त्यांनी मत मांडले. यावेळी बैठकीला अनिल देसाई हलशीवाडी, लक्ष्मण तिरवीर ग्राम पंचायत सदस्य बिदरभावी, जोतिबा केसरेकर बेकवाड, रवी मादार गस्टोळी दड्डी, गंगाराम गुरव खैरवाड, नाना पाटील सन्नहोसुर, कृष्णा मादार ग्राम पंचायत सदस्य नजिलकोडल, परशराम गोल्याळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
