Monday , April 20 2026
Breaking News

खानापूर शहरासह तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शासकीय कार्यालयाच्यावतीने तहसीलदार प्रवीन जैन यांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले.
तर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने माजी आमदार व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले.
यावेळी सचिव आबासाहेब दळवी, समितीचे नेते प्रकाश चव्हाण, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, इदलहोंड ग्राम पंचायत माजी सदस्य यशवंत पाटील, एम. पी. पाटील, श्री. दामले, समितीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नगरपंचायतीच्यावतीने नगराध्यक्ष मजहर खानापूरी, स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक नारायण मयेकर, नारायण ओगले, आप्पया कोडोळी, रफिक वारेमनी, त्याचबरोबर नागरिक अमृत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी खानापूर तालुका विकास आघाडी याच्यावतीने संस्थापक अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले. यावेळी अनिल देसाई, लक्ष्मण तिरवीर, जोतिबा केसरेकर, रमेश पाटील, मल्लापा नलवडे, रवी मादार, गंगाराम गुरव, नाना पाटील, परशराम गोल्याळकर आदी उपस्थित होते.
यावेळी शहरासह तालुक्यातील विविध संघ संघटनेच्यावतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले.
मोठ्या उत्साहात खानापूर शहरात शिवजयंती साजरी झाली.

About Belgaum Varta

Check Also

रौडीशीटरची शांतता बैठकीत हजेरी; काँग्रेसची नाराजी..

Spread the love  खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.एच. गौंडी यांनी आयोजित केलेल्या शांतता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *