Monday , December 8 2025
Breaking News

झुंजवाड के. एन. शिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतकरी ठार

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : झुंजवाड के. एन. (ता. खानापूर) गावच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करत असताना रविवारी दि. २७ रोजी दुपारी बांधावरून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, झुंजवाड के. एन. येथील शेतकरी बसप्पा गणपती पाटील (वय ४६) हा रविवारी दुपारी आपल्या शेतात ऊस लागवडीसाठी ट्रॅक्टरने तास काढत होता.
यावेळी ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना शेतातील बांधाची कल्पना आली नाही. त्यामुळे ट्रॅक्टर बांधावरून पलटी झाला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनाची माहिती मिळताने नागरिकांनी धाव घेऊन लागलीच पलटी झालेल्या ट्रॅक्टरमधून बाहेर काढून नंदगड येथील सरकारी दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवागारात पाठविण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, आई वडिल, भाऊ असा परिवार आहे. शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूने झुंजवाड के. एन. गावात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *