बेळगाव : खानापूर तालुक्यातील शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे काम करीत आहेत. अशा शिक्षकांचा सत्कार करून युवा समिमीतीने त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन कणकुंबी हायस्कुलचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांनी केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त रविवारी खानापूर तालुक्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी गोविंद पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पाटील यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी खानापूर तालुक्यातील जनतेने पुढे येण्याची गरज असून मराठी भाषा जगातील सातव्या क्रमांकाची भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे असून खानापूर तालुक्यातील अनेक शिक्षक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध गावांमध्ये सेवा बजावत आहेत त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासह मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी युवा समितीतर्फे विविध उपक्रम राबविले जात असून येणाऱ्या काळात खानापूर तालुका टोलमुक्त करण्यासाठी विशेष आंदोलन हाती घेतले जाणार आहे. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकटी देण्यासाठी युवावर्गाला संघटित केले जाणार आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमावेळी सुनील चिगुळकर, एन. शी. मेलगे, एल. डी. पाटील, गोविंद पाटील, किशोर शितोळे, प्रकाश मदार, संतोष चोपडे, कमल मुतगेकर यांचा शाल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष पिंटू नवलकर, विनायक सावंत, प्रतीक गुरव, राजू पाटील, ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, रामचंद्र गावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दिगंबर देसाई, विलास बुवाजी, संजय पाटील, हणमंत गुरव, विशाल पाटील, लक्ष्मण पाटील, पांडुरंग राटोळकर, किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राजू कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …