खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरातील मलप्रभा क्रिडांगणावर श्री गजानन ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेला गुरूवारी प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल होते.
यावेळी कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जि. प. सदस्य बाबूराव देसाई, अर्बन बॅंक संचालक मारूती पाटील, भाजप सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप रयतमोर्चा अध्यक्ष सदानंद होसुकर, माजी जि. प. सदस्य लक्ष्मण बामणे, लैला सुगर्सचे एमडी सदानंद पाटील, भाजप नेते राजेद्र रायका, वसंत देसाई, यशवंत गावडे, अमोल बेळगावकर, यल्लापा तिरवीर, नगरसेवक आपय्या कोडोली, नगरपंचायत स्थायीकमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक ऍड. आकाश अथणीकर यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत भाजप तालुका सेक्रेटरी गजानन पाटील यांनी पुष्प देऊन केले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी क्रिकेट मैदानाचे पुजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ऍड. आकाश आथणीकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta