खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील फुटपाथवर बसून व्यापार करणाऱ्या व्यापारी वर्गाला दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत दोन दिवसाचे मार्गदर्शन शिबीर शुक्रवारी येथील केएसआरपी रोडवरील समुदाय भवनात पार पडले.
शिबीराच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेविका मेघा कुंदरगी, नगरसेवक लक्ष्मण मादार, शिबीराचे मार्गदर्शक एस. एम. मुल्ला आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपंचायतीच्या शोभा पत्तार यांनी केले. शिबीराचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालुन करण्यात आले.
यावेळी नंगर पंचायतीच्या अधिकारी राजश्री वर्णेकर यांच्याहस्ते पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
शिबीरात नगरपंचायतीचे स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर म्हणाले की, फुटपाथ व्यापारासाठी १० ते २० हजार रूपयाचे कर्ज दिले जाते. गरजूनी त्याचा लाभ घेऊन वेळेत कर्ज भरावे, असे आवाहन केले. नगरसेवक लक्ष्मण मादार, नगरसेविका मेघा कुंदरगी आदीनी मार्गदर्शन पर विचार मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजश्री वर्णेकर यांनी केले. आभार शोभा पत्तार यांनी मानले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …