खानापूर (प्रतिनिधी) : माचाळी (ता. खानापूर) येथे पाचवी पर्यंतची लोअर प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांची पट संख्या १४ आहे.
माचीळीत गेल्या कित्येक वर्षापूर्वीची शाळा इमारत होती ती मोडकळीस आल्याने माचाळी गावासाठी १९ लाख रूपये मंजुर करून शाळेसाठी दोन खोल्या बांधण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.
मात्र काहीनी माचाळी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गावठानात शाळा बांधण्याचा चंग बाधला आहे. याला शाळा सुधारणा समितीचा, ग्रामस्थांचा विरोध असताना गावापासून दीड किलोमिटर अंतरावरील गावठानात शाळा बांधण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. तेव्हा माचाळी गावातील जुन्या शाळा इमारतीच्या जागेवरच शाळा इमारत बांधण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी, बीईओ अधिकारी, संबंधित सार्वजनिक बांधकाम खाते आदी अधिकारी वर्गाला देण्यात आले.
यावेळी बीईओ लक्ष्मणराव यंकुडी यांनी गावच्या एकोपाने इमारत बांधण्याचा सल्ला दिला.
याशिवाय इतर अधिकारीवर्गाने ही गावाच्या नागरीकांच्या सहमताने इमारत उभी करावी, असे सांगण्यात आले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …