
खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी विधीवत पुजा होऊन मुहुर्तमेढ कार्यक्रमाला सुरूवात झाली.
मुहूर्त मेढ भाजपा नेते खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभहस्ते रोवण्यात आली.
यावेळी गावातील वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात भजन सादर केले.
यावेळी कौंदल गावातील पंचमंडळी पुंडलिक बा जळगेकर, हभप उमाणी दे. पाटील, देवाप्पा म. भोसले, रामकृष्ण शि. पाटील, गणपती गुंडु कोलेकर, उमेश वि. कोलेकर, बळिराम व. पाटील, सहदेव आ. घाडी, ग्राम पंचायत सदस्य उदय ना. भोसले, माजी एपीएमसी अध्यक्ष रामचंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सतिश टो. पाटील, नागाप्पा गो. पाटील, यशवंत तु. पाटील, विठ्ठल मो. मादार व वारकरी संप्रदायाचे संत मंडळी, गावातील नागरिक युवक युवती व महिलावर्ग उपस्थित होत्या..
Belgaum Varta Belgaum Varta