खानापूर (प्रतिनिधी) : जत- जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील अर्धवट असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला तब्बल दोन वर्षानंतर सुरूवात करण्यात आली.
जत- जांबोटी महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तसेच डांबरीकरणासाठी २० कोटीचे अनुदान मंजुर करण्यात आले. यामध्ये पारिश्वाड ते खानापूर शिवाजीनगर पर्यंतच्या जांबोटी रस्त्याच्या काम गेल्या दोन वर्षापासून हातात घेतले आहे.
याकामा निमित्ताने जांबोटी क्राॅसवरील गाळे, लहाने दुकाने उधळुन लावली. आणि आज गेली दोन वर्षे हातावर काम करणारे गाळे धारक उघड्यावर पडले आहेत. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणे आज कठीण झाले. याकडे तालुका आमदार, नगरपंचायत आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम डोळे झाक करून आहेत. आता रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. आता गटारीचे काम संपावायला पुन्हा एक वर्ष वेळ काढणार त्यानंतर गाळे उभारण्यास देणार की केवळ आश्वासन राहणार हे देवालाच माहित.
तेव्हा डांबरीकरण संपताच गटारीचे काम पूर्ण करून गाळेधारकांना न्याय द्यावा,अशी मागणी गाळेधारकासह शहरातील नागरिकांतून होत आहे.
सध्या करण्यात येत असलेले डांबरीकरण हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. याचबरोबर खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील रस्त्याची मोहरीचे कामही होणे गरजेचे आहे.