
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिपावसाचा तसेच अंतिजंगलाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी परिसरात बुधवारी दि. ९ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावुन झोडपले.
मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे व वाढत्या उष्णतामुळे जीव कासावीस होत आहे. त्यातच बुधवारी सकाळपासून हवेत वाढत्या उष्णतेमुळे जीवाची लाहीलाही होत होती. त्यानंतर बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावुन तब्बल अर्धा तास झोडपले. त्यामुळे कणकुंबी परिसरात पाणीच पाणी झाले व सारा परिसर थंडगार झाला.
अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र एकच गोंधळ उडाला. वारा-पाऊस असल्याने घराचे पत्रे पलटले
पहिलाच पाऊस असल्याने गटारीतून पाणी तुंबले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
मात्र काजू, आंबा मोहरलेल्या झाडांना अवकाळी पावसाचा लाभ होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta