
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कडक उन्हाळा त्यातच वाढती उष्णता दुपारच्या वेळी रकरकते उन्ह यामुळे जीव कासावीस होतो. अशातच गुरूवारी सकाळपासून हवेत वाढती उष्णता होऊन दुपारपासुन आकाशात ढगाळ वातावरणामुळे सायंकाळी खानापूर शहरासह तालुक्यातील गर्लगुंजी, इदलहोंड, गणेबैल आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
तर बुधवारी कणकुंबी भागात दुपारी अडीच्या सुमारास अर्धातास अवकाळी पाऊस झाला.
तर गुरूवारी सायंकाळी अवकाळी पाऊसाने हजेरी लावून खेडे गावातील शिवारात कच्च्या वीटाचे नुकसान केले.
अवकाळी पावसाची चाहुल लागताच वीट व्यवसायिकांतून एकच धांदल उडाली.
कच्च्या वीटा झाकण्यासाठी वीटभट्टी मजूर प्लॅस्टीक तसेच गवत आदीचा वापर करून वीटा झाकण्याचा प्रयत्न करत होते.
काही भागात पावसाने हजेरी लावून वीटाचे नुकसान केले आहे. त्यामुळे वीटांचे नुकसान झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta