
खानापूर : खानापुरातील मुरगोड प्लॉटपर्यंतच्या नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी खानापूर काँग्रेसच्या महिला शाखेने केली आहे. खानापूर शहरातील मुरगोड प्लॉट भागातील सिरॅमिक, स्टेशन माळ भागातील रस्ते अनेक दिवसांपासून खराब झाले आहेत. त्यामुळे लोकांना येथून येण्या-जाण्यास त्रास होत आहे. वाहने घसरून चालक जखमी झाल्याच्या घटनाही येथे वरचेवर होत आहेत. त्यामुळे येथील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून त्यांचे डांबरीकरण करावे अशी करत खानापूर काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मेघा देसाई, पुष्पा खोबरेकर, किरण हवळे, बिंदू सांबरेकर, धन्या कुलकर्णी, विमल सुतार, गीता देसाई, सरिता पाटील, आर. आर. शहापूरकर, गीता जांगळे, जयश्री सावंत यांच्यासह महिला काँग्रेस कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta