खानापूर (प्रतिनिधी) : निलावडे (ता. खानापूर) ग्राम पंचायत हद्दीतील आंबोळी ते मासेगाळी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण माजी एमएलसी विवेकराव पाटील यांच्या फंडातून पाच लाख रुपये खर्चून करण्यात आला.
यासाठी निलावडे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर व माजी ग्राम पंचायत सदस्य ओमाणी पाटील यांच्या प्रयत्नाने या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सिमेंट काँक्रीट कामाचा शुभारंभ ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी मशीनची पुजा करून केली तर ओमाणी पाटील यांनी श्रीफळ वाढविले.
यावेळी कार्यक्रमाला कृष्णा शास्त्री आंबोळी, बबन नाईक नारायण पाटील, आप्पा नाईक, पांडुरंग कांबळे, सचिन कांबळे, सखाराम कोळेकर, प्रकाश कांबळे तसेच महिला वर्ग उपस्थित होत्या.
यावेळी निलावडे ग्राम पंचायत अध्यक्षा आरती अर्जून कांबळे व सर्व ग्राम पंचायत सदस्याचे सहकार्य लाभले.
आंबोळी ते मासेगाळी रस्त्याचे सीमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्याने ग्रामस्थातून समाधान पसरले आहे.
