Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर शांतिनिकेतन काॅलेजात सीईटी, नीट, जेईईचे होणार मार्गदर्शन

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी संचालित शांतिनिकेतन काॅलेजात सीईटी, नीट, जेईई मार्गदर्शनाची सोय होणार आहे, अशी माहिती श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी दिली.
खानापूर येथील शांतिनिकेतन काॅलेजात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत सचिव प्रा. आर. एस. पाटील म्हणाले की, व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेना सामोरे जाण्यासाठी अकरावी, बारावीपासून गुणात्मकतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच करिअरच्या दिशा निवडताना सीईटी, नीट, जेईई सारख्या परीक्षेची तयारी होणे गरजेचे आहे.
खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अकरावी, बारावी बरोबर सीईटी, नीट, जेईई सारख्या स्पर्धात्मक परीक्षाना सामोरे जाण्यासाठी शांतिनिकेतन पदवी पूर्व काॅलेज व यापुढे महेश पी काॅलेजच्या सोबतीने शांतिनिकेतन काॅलेजात गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा अकॅडमिक वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी शांतिनिकेतन पदवी पूर्व काॅलेजात संपर्क साधावा, असे आवाहन केले.
यावेळी लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांनी उपस्थितीचे स्वागत करून म्हणाले की, सध्याच्या स्पर्धात्मक युगात अभ्यासक्रमापलीकडे विद्यार्थी वर्गाला सखोल चिंतन, प्रत्येक विषयाचे बारकाईने विश्लेषण करणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अकारावी, बारावी परिक्षेबरोबर सीईटी, नीट, जेईई सारख्या परिक्षाचा सराव व्हावा. आणि परीक्षाना सामोरे जावे. यासाठी सीईटी, नीट, जेईई मार्गदर्शनाची गरज आहे, असे सांगितले.
यावेळी प्राचार्य विशाल करंबळकर, प्रा. मनीशा भोसले आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *