खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेच्या सन १९५६ साली बांधण्यात आलेल्या जुन्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला इमारतीत बसणे धोक्याचे झाले आहे.
सिंगीनकोप पूर्व प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता ते पाचवी पर्यंतचे वर्ग चालतात. तर या शाळेत एकूण ४५ विद्यार्थी शिक्षण घेतात.
जुन्या इमारतीची दुरावस्था पाहुन जानेवारी ते एप्रिलपर्यंत विद्यार्थी बाहेरील झाडाच्या खाली बसुन शिक्षण घेतात. येत्या नविन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना कोठे बसवावे याची चिंता शिक्षकासह गावकऱ्यांना पडली आहे.
मे महिण्यापासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे तेव्हा संबंधित शिक्षण खात्याच्या वतीने बीईओ लक्ष्मणराव यकुंडी यांनी नविन शाळा इमारतीसाठी मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी शाळा सुधारणा समितीच्यावतीने तसेच ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …