
खानापूर (प्रतिनिधी) : जिल्हा कृषी खाते आणि खानापूर तालुका कृषी खात्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला मार्गदर्शन व सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी तज्ञ डॉ. एस. एस. हिरेमठ, डॉ. आर. बी. सुतगुंडी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली.
खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी कृषी तज्ञ डॉ. एस. एस. हिरेमठ, डॉ. आर. बी. सुतगुंडी यांनी शेतकऱ्यांना ऊस व मिरची पिकाच्या लागवडीविषयी तसेच अधिक उत्पन्न मिळविण्याबदल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला कृषी अधिकारी, पशु अधिकारी, तसेच बागायत अधिकारी आणि खानापूर तालुक्यातील अनेक गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन तालुक्यातील रवळू मोहीते, श्रीधर हिरेबिल्लदवर, लिंगनगौडा पाटील, रूद्रापा वड्डेबैल, शशिकांत उपाशी, आदी शेतकऱ्यांचा आदर्श शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला. तर शेतकरी मंजुनाथ उळेगड्डी यांना जिल्हास्तरीय आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंजुनाथ कुसुगल यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta