खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड ता. खानापूर येथे अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन खानापूर यांची मासिक बैठक शनिवार दि. 26 रोजी पार पडली. यावेळी बैठकीला एकूण 21 सदस्यांपैकी 17 सदस्य बैठकीला हजर होते. या अगोदर अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन खानापूरची स्थापना होऊन दीड वर्ष झाले होते. तसेच आपल्या वैयक्तिक कारणामुळे अध्यक्ष रियाज पटेल यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो सर्व सदस्यांनी सर्वानुमते मंजूर केला व सर्व सदस्य व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांची बैठक होऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन खानापूरचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून मलप्रभा साखर कारखाना अध्यक्ष नासिर बागवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व उपाध्यक्ष म्हणून इरफान तलिकोटी यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यदर्शी म्हणून लियाकत अली बच्चनवर व जॉईंट कार्यदर्शी म्हणून इस्माईल पिरजादे यांची निवड करण्यात आली. तसेच खजिनदार म्हणून मुगूटसाब (बुड्डा), समशेर (बिडी) यांची निवड करण्यात आली.
निवड होताच पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालुन अभिनंदन करण्यात आले.
तसेच बैठकीत अंजुमन मायनॉरिटी सोशल वेल्फेअर फाऊंडेशन खानापूर मार्फत सर्व समाजातील लोकांना, गोरगरिबांना सुविधा, शिक्षण आणि आरोग्यबाबत मदत करण्याचे ठरवले. आरोग्याबद्दल मदत म्हणून तालुक्यामध्ये दोन रुग्णवाहिका देण्याचे ठरवले.
बैठकीला तालुक्यातील अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …