
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीची बैठक गुरूवारी दि. ३१ मार्च रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटीचे अध्यक्ष प्रकाश बैलूरकर होते. तर व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी तसेच चीफ ऑफिसर बाबासाहेब माने होते.
प्रारंभी प्रेमानंद नाईक यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी स्थायी कमिटीच्या बैठकीत खानापूर शहरातून एकूण ११ तक्रारी अर्ज आले होते.
यामध्ये घर फाळा, जागा, मालमत्ता आदी विषयांवर तक्रारी अर्ज होते.
या विषयावर चर्चा करून ठराव पास करण्यात आले.
बैठकीला नगरसेवक आप्पया कोडोळी, विनायक कलाल, विनोद पाटील, महमदरफिक वारेमणी, तसेच नगरसेविका मिनाक्षी बैलूरकर, सहारा अब्दुल कदार सनदी, जया भुतकी, राजश्री तोपिनकट्टी तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी आदी उपस्थित होते. शेवटी प्रेमानंद नाईक यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta