Tuesday , September 17 2024
Breaking News

खानापूरचे हायटेक बसस्टँड अद्याप प्रतिक्षेत!

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : भाजप सरकारच्या कालावधीत खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवर हायटेक बसस्टँडचा भुमीपुजन झाला. हा खानापूर शहरावासीयाची सुखद घटना आहे.
खानापूर शहराचा विस्तार वाढला तसे उपनगरे वाढली. तालुक्यातील खेडोपाड्यातील नागरिकांनी खानापूर शहराकडे धाव घेतली. तसे शहराच्या विकासाचा प्रश्न वाढला. त्यात प्रामुख्याने हायटेक बसस्टँडचा प्रश्न मार्गी लागला.
खानापूर हायटेक बसस्टँड कामासाठी साडे सात कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता खानापूर शहरासह तालुक्यातील नागरिक हायटेक बसस्टँडच्या प्रतिक्षेत आहेत.
येत्या ११ महिन्यात खानापूर शहरातील हायटेक बसस्टँड पूर्ण करणार असे खानापूरच्या लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले.
आज मात्र खानापूर शहरातील बसस्टँडची दुरावस्था फारच गंभीर आहे.
सध्या एकीकडे कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे खानापूरच्या बसस्टँडमधील खड्डी उखडल्याने दिवसभर धुळीचे लोळ उडत आहेत. परिणामी प्रवाशाना या धुळीचा त्रास होत आहे. बसस्टँडच्या आवारात खड्डे पडले आहेत. खड्डीचा पत्ताच नाही. उन्हाची वाढती उष्णता व बसस्टँडवरील पत्रे त्यामुळे दुपारच्या वेळी बसस्थानकात बसणे प्रवाशांना खुप त्रासाचे होत आहे. वाढत्या उन्हामुळे प्रवाशांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. बसस्टँडमध्ये वाहनाच्या पार्किंगची समस्या आहे. बसस्टँडच्या प्रवेशद्वारातच खड्डे पडले आहेत. त्यामुळे बसेसना बसस्टँडमध्ये ये-जा करताना याचा धोका संभवतो आहे. अशा अनेक समस्या प्रवाशांना भेडसावत आहेत. तेव्हा खानापूर हायटेक बसस्टँडचे काम लवकरात सुरू व्हावे.
खानापूर शहराच्या सौंदर्यात चांगलीच भर पडावी. यासाठी खानापूर शहरासह, तालुक्यातील नागरिक हायटेक बसस्टँडच्या प्रतिक्षेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!

Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *