

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून इदलहोंड केंद्राचे सीआरपी गोविंद पाटील, सिंगीनकोप ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, तसेच शाळा सुधारणा समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलीच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली.
प्रास्ताविक अतिथी शिक्षक नामदेव कुंभार यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत प्रभारी मुख्याध्यापिका व कन्नड शिक्षिका सौ. एल. डी. नलवडी यांनी केले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्याते आले.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधुन सीआरपी गोविंद पाटील, अतिथी शिक्षक नामदेव कुंभार, सौ. मुक्ता नंदाळकर यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक, व पाहूण्यांची निरोपपर भाषणे झाली. कार्यक्रम सुत्रसंचालन व आभार नामदेव कुंभार यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta