
खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी २० कोटीचा रूपयाचा निधी मंजुर करून दोन वर्षापूर्वी कामाचा शुभारंभ करण्यात आला. आतापर्यंत केवळ रस्त्याचे डांबरीकरण तेवढेच झाले. मात्र गटारीचे काम अद्याप झाले नाही. गटारी न झाल्याने गाळे उभारण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षापूर्वी गाळे काढण्यात आले होते. मात्र आजतागायत गाळे उभारण्यात न आल्याने शेवटी गाळेधारकाना उपासमारीची वेळ आल्याने गाळेधारकांनी पोटासाठी केवळ वाहनातून चहा, हाॅटेल, किचनसेंटर, किराणा दुकान, भाजीपाला, आदी व्यापार चालु करण्यात आले आहे.
त्यामुळे गाळे उभारण्याआधीच जांबोटी क्राॅसवर व्यापार सुरू आहे.
जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण गेल्या दोन वर्षानंतर पूर्ण झाले आहे त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचा, तसेच प्रवाशांचा या रस्त्याचा त्रास दुर झाला आहे. मात्र केवळ गटारीचे काम अद्याप व्हायचे आहे.
तेव्हा संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारवर्गाने लवकरात लवकर जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करून गटारीचे काम सुरू करावे. तसेच गाळेधारकांना गाळे उभारून सहकार्य करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
मात्र तालुक्याच्या आमदाराचे तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta