Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर तालुक्याच्या हेस्काॅम खात्यात १८२ जागा रिक्त

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. अशा तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वायरमनच्या जागा न भरल्याने हेस्काॅम खात्यात १८२ वायरमनच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करताना हेस्काॅम खात्याला तारेवरची कसरत करावीशी लागते.
नुकताच झालेल्या वादळी पाऊसाने तालुक्यातील जंगल भागातील खेड्यात खांब पडणे, विद्युत तारा तुटून पडणे, असे प्रकार घडले आहेत.
त्यामुळे वेळेत दुरूस्ती करण्यास अडचणी निर्माण होत असुन हेस्काॅम खात्यात जागा भरण्यास चालढकल होत असल्याने कामाचा बोज वाढला आहे.
सध्या खानापूर तालुक्यात हेस्काॅम खात्यात केवळ ७१ वायरमन कार्यरत असुन एवढ्या मोठ्या तालुक्यात दुरूस्तीची कामे करताना वायरमन कर्मचारी वर्गाला कठीण होत आहे.
तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर दुरूस्ती वेळेत होत नसल्याने शेतकरी वर्गाला पिकाना पाणी देताना अडचण निर्माण होत आहे. याची दखल घेउन वायरमनच्या जागा भरण्याची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे.
हेस्काॅम खात्याच्या कार्यकारी अभियंत्या सौ. कल्पना तिरवीर यानी बोलताना सांगितले की, खानापूर तालुक्यातील रिक्त वारमनच्या जागा भरण्यासाठी वारंवार मागणी करून ही अद्याप जागा भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अनेक समस्या येत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *