Tuesday , March 3 2026
Breaking News

सिंगीनकोप शाळेत समुदाय दत्त कार्यक्रम उत्साहात

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील मराठी मुलाच्या शाळेत समुदाय दत्त कार्यक्रम शनिवारी दि. ९ रोजी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते. तर नोडल अधिकारी म्हणून गणेबैल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक पी. टी. चोपडे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी तालुका सदस्या कविता कुंभार, शाळा सुधारणा समितीच्या सदस्या मनिषा कुंभार, लक्ष्मी गुरव, आरती कुंभार, ललीता कुंभार, वैशाली पाटील, रेखा पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रभारी मुख्याध्यापिका सौ. एल. डी. नलवडी यांनी केले. यावेळी पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेश फोटो पुजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रगती बदल नोडल अधिकारी पी. टी. चोपडे, अध्यक्ष धोंडीबा कुंभार, मनिषा कुंभार आदीनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रगती पत्रक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अतिथी शिक्षक नामदेव कुंभार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *