
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेची मासिक बैठक शुक्रवार दि. ८ रोजी बी.ई.ओ. कार्यालयात पार पडली. बैठकीला तालुका शिक्षक संघटनाचे अध्यक्ष वाय. एम. पाटील होते.
यावेळी शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच बीईओ लक्ष्मणराव यक्कुंडी यांनी शिक्षक संघटनेच्या मागणीप्रमाणे शिक्षकांची अरिअर्स बिले, फेस्टिव्हल ॲडव्हान्स बिले तसेच सरेंडर बिले आपल्या कार्यालयातील कर्मचार्यांच्याकडून करून घेऊन पास केली. त्याबद्दल क्षेत्रशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव यक्कुंडी, तसेच बीईओ कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी, सुप्रिडेंट दुरगुंडीमठ, लिपिक निळकंठ कुंभार, विश्वनाथ कंबार, राजू चिगुळकर, संजय पाटील, नदाफ, आयेशा मॅडम, लक्ष्मीबाई नाईक, लक्ष्मण मिसाळे, श्रीमती पूजा पाटील यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष वाय्. एम्. पाटील, सचिव एम्. आर. चवलगी, सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष बी. एम्. यळ्ळूर, शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष इब्राहीम सनदी, महिला उपाध्यक्षा अंजना देसाई, सहकार्यदर्शी भोमाजी कांबळे, श्रीमती एन्. जे. देसाई, संघटना कार्यदर्शी तुलसीदास मोरे, श्रीमती जी. सी. गुर्लहोसूर, खजिनदार किरण पाटील, संचालक पिराजी पाखरे, सतीश हळदणकर, श्रीमती तुरमुरी तसेच संघटनेचे सर्व संचालक, नामनिर्देशित संचालक आणि शिक्षक उपस्थित होते. अध्यक्ष वाय्. एम्. पाटील, व बी. एम्. यळ्ळूर यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यदर्शी एम्. आर. चवलगी यांनी प्रास्ताविक व स्वगत केले. तर उपाध्यक्ष सनदी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta