Wednesday , March 4 2026
Breaking News

तोपिनकट्टीत महाप्रसादाने गणेश मुर्तीचा वर्धापनदिन सोहळा साजरा

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टीत (ता. खानापूर) येथे गेल्या दोन दिवसापासुन श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा २० वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला.
शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी श्री गणेश मूर्तीला अप्पाजी हलगेकर यांच्या हस्ते अभिषेक घालुन सोहळ्याला उत्साहात सुरूवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव गुरव उपस्थित होते. तर दीपप्रज्वलन मल्लेशी खांबले, विठ्ठलराव करंबळकर, मारूती गुरव ग्राम पंचायत उपाध्यक्ष, चन्नापा गुरव आदिंच्याहस्ते करण्यात आले.
तर विविध फोटोचे पुजन लक्ष्मण गुरव, जनरल सेक्रेटरी तुकाराम हुंदरे, नारायण गुरव, नागेश जोगोजी, गंगाराम हलगेकर, राजू हलगेकर, परशराम तिरवीर आदिंच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी करंबळकर, रघूनाथ फटके, लक्ष्मण तिरवीर, सौ. रूपा तिरवीर, सौ. अनिता मुरगोड, सौ. रेखा सुतार, रेणूका कोलकार, अशोक कंरंबळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत के. जी. कुंभार यांनी केले.
यावेळी बोलताना अध्यक्ष महादेव गुरव म्हणाले की, तोपिनकट्टीत गणेशमुर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा २० वा वर्धापनदिन मोठा उत्साहात साजरा होत आहे. गेली २० वर्षा कधी खंड होऊ न देता वर्धापनदिन सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्या बरोबरच महाप्रसादाचे आयोजन करून गावात आनंदसोहळा साजरा केला जातो. ही परंपरा अशीच कायम ठेवून एकोपाने वर्धापनदिन सोहळा साजरा करू असे सांगितले. यावेळी पाहुण्यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के. जी. कुंभार यांनी केले. तर आभार यल्लापा कुप्पटगीरी यांनी मानले.
शनिवारी दि. ९ रोजी सकाळी सत्यनारायण पुजा होऊन महाआरती झाली. त्यानंतर प. पू. रामदास महाराजांचे प्रवर्चन झाले. त्यानंतर महाप्रसादाने गणेश मुर्तीचा वर्धापनदिन सोहळ्याची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *