
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील श्री ज्योतिर्लिंग सर्वागिण विकास संघाच्या दशकपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधुन फिटनेस क्लब खानापूर व पाटील गार्डन करंबळ क्रॉस यांच्या सौजन्याने आरोग्य भारती याच्या मार्गदर्शनानुसार रक्तदान विषयी जागृती व्हावी म्हणून रविवारी दि. 10 रोजी येथील पाटील गार्डनमध्ये आयोजित रक्तदान शिबीरात जवळपास 50 जणांचा सहभाग होता.
करंबळ क्रॉसवरील पाटील गार्डन सभागृहातील रक्तदान शिबीर कार्यक्रमाला आरोग्य भारतीचे प्रेसिंडेट वासुदेव इनामदार, व्हाईस प्रेसिंडेट गोपालराव देशपांडे, विठ्ठलराव बाळेकुंद्री, लक्ष्मण शेट्टी, संजय कुलकर्णी, प्रशांत घाडी, डॉ. विठ्ठल माने, डॉ. आनंद एस, तसेच केएलई ब्लड बँक व कर्मचारी उपस्थित होते.
शिबीराची सुरूवात दत्तू पाटील व रूक्मिणी पाटील व इतरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी रक्तदान शिबीराला खानापूर, करंबळ व इतर गावातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
Belgaum Varta Belgaum Varta