
खानापूर (प्रतिनिधी) : अबणाळीत (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही पांडुरंग अखंडनाम सप्ताहाला मंगळवारी दि. 12 रोजी प्रारंभ झाला.
सकाळी पोथी स्थापना होऊन कार्यक्रमाला सुरूवात झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिताराम राणे होते.
यावेळी कार्यक्रमाला लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, अॅड. आकाश आथणीकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, विठोबा सावंत, बाळू बिर्जे, वासु कालमनकर, पुन्नापा बिर्जे, ग्रा. पं. सदस्य अरूण गावडे, ओमाणा नाईक, मारूती देसाई, विष्णू ओशिनकर, चंद्रकात चिखलकर, दाजीबा पार्सेकर आदीच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विविध फोटोचे पुजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधुन विनायक दळवी विद्यार्थी, शिक्षक बापू दळवी, आदीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सदानंद पाटील, विनायकराव मुतगेकर, भरमाणी पाटील, बाबूराव देसाई आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजू धुरी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta