
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी झाली.
हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी रंगनाथ सी. एस. यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी बोलताना हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी रंगनाथ सी. एस. म्हणाले की, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, पत्रकार, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, जागतिक मानव मुक्तीच्या चळवळीतील एक शिल्पकार, बहुजनांचे कैवारी, प्रखर कायदेपंडित, शेतकऱ्यांचे वाली, स्त्रियाना घटनात्मक समान दर्जा देणारे, मुक्तीदाता, बहुजनाचा मूकनायक, विद्येचा महामेरू, अशा असंख्या पदव्यानी सन्मानित झालेले डॉ. आंबेडकर यांची १३१वी जयंती साजरी करताना आम्ही अभिमान जागरूक होतो. त्याचे आदर्श असेच कायम जतन करू हीच त्याची खरी आठवण आहे.
यावेळी कार्यक्रमाला हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी परशराम कपवाड, के. एम. खडाडी, व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta