
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या मठ गल्लीतील कवळेमठ हॉलमध्ये रविवारी दि. 17 रोजी शरद फौंडेशन, केएलई डिपार्टमेंट ऑफ ओर्थोपडीक, फिजीओथेरपी व रोटरी कल्ब बेळगांव यांच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात जवळपास 300 रूग्णांचा सहभाग होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. फौंडेशनचे संस्थापक शरद केशकामत, पिंटू सडेकर, किशन चौधरी, तसेच डॉ. संजीव नाईक, डॉ, अनंत चौगुले, डॉ. लक्ष्मी, डॉ. देवगौडा, रोटरी क्लब चेअरमन डॉ. गोविंद मिसाळे, सदस्य मंगेश देशपांडे, नारायण देशपांडे, श्री. कुलकर्णी गुंजी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे शरद केशकामत फौंडेशन अध्यक्ष शरद केशकामत यांनी स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरूवात झाली.
यावेळी बोलताना शरद केशकामत म्हणाले की, तालुक्यातील शेतकरी कटुंबातील महिला, कुटुंब प्रमुख आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आजारावर वेळीच लक्ष देत नाही. अशावेळी त्यांना आर्थिक अडचणी येतात व दुखण अंगावर काढतात. असा प्रकार गरीब कुटुंबाकडून होऊ नये वेळीच उपचार व्हावे. म्हणून शरद केशकामत फौंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याला अमाप प्रतिसाद मिळाला, असे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी व उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार किशन चौधरी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta