खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर हेस्कॉमच्या कार्यालयात नुकताच ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक कार्यकारी अभियंता रंगनाथ सी. एस. होते.
मेळाव्यात तक्रार मांडताना मोदेकोप गावचे शेतकरी श्रीकांत बाळापा कांबळे म्हणाले की, सर्व्हे नंबर 122/16 मधील शेतात एक वर्ष झाले. टी सी बंद आहे. त्यामुळे वीजपुरवठा होत नाही. तेव्हा मंगळवारी येऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली.
कांजळे गावच्या दौलत महादेव गुरव यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत तारा तसेच विद्युत खांब बदलावणे, अशी मागणी करण्यात आली. तसेच कांजळे गावातील अशोक वाली आणि सुभाष गावडे यांच्या घराजवळ विद्युत खांबे उभे आहेत. मात्र विद्युत तारा नाहीत. त्यामुळे वीजपुरवठा होत नाही.
खानापूर तालुक्यातील कापोली केएसी ते मुडगई गावच्या रस्त्यावर विद्युत खांब घालणे आदी समस्यावर ग्राहक मेळाव्यात चर्चा करण्यात आली.
यावेळी हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्या सौ. कल्पना तिरवीर या ग्राम वास्तव्य कार्यक्रमाला मेंढील (ता. खानापूर) येथे उपस्थित होत्या. त्यामुळे ग्राहक मेळाव्याला हजर नव्हत्या. तर हेस्कॉमचे कर्मचारी परशराम कपवाड, के. एम. खडाडी तसेच खानापूर तालुका विद्युत कंत्राटदार राजू पारेकर, व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …