
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-पणजी महामार्गावरील शहरापासून जवळील मलप्रभा नदीच्या नविन पुलापासून ते गोवा क्रॉसपर्यंतच्या महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. याकडे संबंधित खात्याचे व तालुका प्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत आहे.
मागील वर्षी लायन्स क्लब व करंबळ गावच्या युवा कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुडविले होते. मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी रस्त्याच्या विकासासाठी आजपर्यंत कोणतीच हालचाल केली नाही.
त्यामुळे नुकताच झालेल्या वादळी पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
सध्या या रस्त्यावरून वाहनधारकांना ये-जा करताना खड्ड्याशी जीवघेणा प्रवास करावा लागतो. तेव्हा संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाने या महामार्गाची दखल घेऊन रस्ता त्वरीत दुरूस्त करावा, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta