
खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी योजनेच्या सकल योजनेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खानापूर तहसील कार्यालयाच्यावतीने बुधवारी दि. २० रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारातून सकल योजनेची प्रचार फेरी काढण्यात आली.
यावेळी तहसीलदार प्रविण जैन यांच्याहस्ते सकल योजनेच्या प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी तहसील कार्यालयापासून फेरीची सुरूवात झाली. शिवस्मारकातून बाजार पेठेतून देसाई गल्ली मार्गे जुन्या तहसील कार्यालयापर्यंत फेरी काढण्यात आली.
या सकल योजनेत जवळपास ४३ योजनांचा सहभाग आहे. या सकल योजनेचा लाभ नागरिकांनी करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्रविण जैन यांनी यावेळी केले.
यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री, उपतहसीलदार के. आर. कोलकार, आर. वाय. मॅगेरी, सुनिल देसाई, महांतेश हिरेमठ, शिवलिला अंगडी, शशिकला व इतर तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta