
खानापुर (प्रतिनिधी) : वाहन अपघात किंवा युद्धात कोणत्यातरी कारणांनी नैसर्गिक अवयव गमाविणाऱ्या व्यक्तींना कृत्रिम अवयवांची गरज भासते. तसेच कर्करोग, संसर्ग आणि अभिसरण रोग इत्यादींमुळे नैसर्गिक अवयव कापावे लागून त्याना कृत्रिम अवयाची गरज निर्माण होते. अशा शिबीरातून ही गरज पूर्ण होते, असे मत खानापुर नगर पंचायतचे अध्यक्ष, मजहर खानापूरी यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
खानापूर तालुक्यातील दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून श्री. व्ही. आर. देशपांडे मेमोरियल ट्रस्ट हळियाळ, कॅनरा बँक देशपांडे आर. सेट संस्था, हळियाळ, लायन्स क्लब, खानापुर, ऑल इंडिया जैन युथ फेडेरेशन आणि महावीर लिंब, हुब्बळी यांच्या संयुक्त विद्द्यमाने तपासणी शिबिराचे आयोजन खानापूर येथीस समुदाय भवनात करण्यात आले होते.
यावेळी शिबिराचे अध्यक्षस्थानी, कॅनरा बँक देशपांडे आर. सेट संस्थेचे योजना संयोजक, विनायक चव्हाण होते.
प्रमुख पाहूणे म्हणून नगराध्यक्ष मजहर खानापूरी, मल्लेशी बेनकट्टी, अध्यक्ष, लायन्स क्लब खानापुर, नगर पंचायत स्थायीकमिटी अध्यक्ष प्रकाश बैलूरकर, एम. एस. नायकर, वरिष्ठ तंत्रज्ञ, महावीर लिंब, हुब्बळी, सुदर्शन तंत्रज्ञ, महावीर लिंब, हुब्बळी, महिला व बाल विकास केंद्र,व एम.आर. डब्ल्यूच्या समीना खानापूरी, तिरूपती कांबळेआदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत संतोष परीट यांनी केेले. या शिबिरमध्ये खानापुर तालुक्यामधून आलेल्या ४५ दिव्यांगांना कृत्रिम पाय, ४ जनाना काॅलिपर,१ दिव्यांगांना हात असे एकून ५० दिव्यांगानी लाभ घेतला.
यावेळी संस्थेचे योजनाधिकारी संतोष परीट सुत्रसंचालन केले. संतोष सिध्दनीकोप्प यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta