खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील कचर्यापासून गांढूळ खत निर्मिती प्रकल्पाला सुरूवात होत आहे. मन्सापूर येथील कचरा डेपोत सदर प्रकल्प होणार त्यामुळे प्रत्येक महिन्याला एक टन गांढूळ खत निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे गांढूळ खत निर्मिती होणार दुसरीकडे शहरातील कचर्याच्या विल्हेवाटीची आडचण दूर होण्यास मदत होणार.
खानापूर शहरापासून जवळ असलेल्या मन्सापूर येथे कचरा डेपो आहे. खानापूर शहरातील कचर्याची उचल झाल्यानंतर या कचरा डेपोत जमा केला जातो.
मात्र गेली कित्येक वर्षे कचरा प्रक्रिया प्रकल्पाची सोय नसल्याने कचरा साठा करून कचर्याचे मोठ्या राशी तयार झाल्या होत्या. त्यामुळे कचरा डेपोला जागा अपुरा पडतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
यावर उपाय म्हणून गांढूळ खत निर्मितीची संकल्पना आली. त्यातून गांढूळ खत निर्मिती करण्यात आली.
खानापूर नगरपंचायतीचे चिफऑफिसर बाबासाहेब माने, नगराध्यक्ष मजहर खानापूरी, स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी गांभिर्याने लक्ष देऊन गांढूळ खत निर्मिती केली. तसेच कचरा डेपोत कर्मचारीवर्गाची नियुक्ती केली. गांढूळ खत निर्मितीसाठी महिना ते दीड महिना प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यानंतर महिन्याला एक टन गांढूळ खत निर्मिती होते. तसेच पाच रूपये प्रति किलो गांढूळ खताची विक्रीही होते. त्यामुळे नगर पंचायतीला आर्थिक लाभ होतो. व दुसरीकडे शहरातील कचर्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लागला. तेव्हा खानापूर शहरवासियांना सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळ्या पध्दतीने देणे गरजेचे आहे, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …