
खानापूर (प्रतिनिधी) : खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार फंडामधून गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्री माऊली मंदिर रस्त्यासाठी पेव्हर्स आणि गावातील पांडवनगर सी. सी. रोडसाठी दहा लाख रु. चा निधी मंजूर करून नुकताच कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या कामाचा शुभारंभ प्रसंगी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, नंदगड मार्केटींग सोसायटी माजी चेअरमन गोपाळ पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, ग्राम पंचायत अध्यक्षा सौ. अनुराधा निट्टुरकर,नतसेच ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुरेश मेलगे, सदस्य परशराम चौगुले, पाटील, हणमंत मेलगे, अजितराव पाटील, बजरंग दल तालुका प्रमुख नंदकुमार निट्टुरकर, राजू सिध्दानी, शांताराम मेलगे, पांडुरंग भातकांडे, प्रमोद पाटील, श्री. सोमनाथ यरमाळकर, ग्राम पंचायत सदस्या सौ. रेखा कुंभार, सौ.वंदना पाटील, सौ.अन्नपूर्णा बुरुड, सौ.सविता सुतार, सौ.ललिता कोलकार, कॉन्ट्रॅक्टर विनोद पाटील, पिडीओ जोतिबा कामकर, बाळू वड्डेबैलकर, यल्लुपा व्हळानाचे, शंकर गोरे, पुजारी विठ्ठल पाटील, तसेच गावातील नागरिक व युवक उपस्थित होते.
यावेळी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व इतर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गर्लगुंजी गावची ग्रामदेवता श्री माऊली देवाच्या यात्रेच्या आगोदर पेव्हर्स बसण्याचे काम पूर्णत्वाकडे नेणार असल्याचे सांगण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta