खानापूर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा डीसीसी बँकेने खानापूर तालुक्यातील कणकुंबी (आमटे), वाटरे, आणि नजिलकोडल आदी कृषीपतीन सोसायटीची कृषी पत अडवून ठेवली आहे, असा आरोप आमटे कृषी पत्तीन सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यानी खानापूर येथील शिवस्मारक सभागृहातील बैठक केला.
बेळगांव डीसीसी बँकेने दरवर्षी सरकारच्यावतीने शेतकरी वर्गाला शुन्य टक्ते दराने कृषी कर्ज थेट शेतकरीवर्गाच्या खात्यावर जमा केले जाते.
त्यामुळे गरीब शेतकरी वर्गाला अवजारे, खते, बियाणे तसेच वर्षभराचे शेती नियोजन व्यवस्थितपणे करता येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासुन या तिन्ही कृषी पत्तीन सोसायटीना पत देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे शेतकरी दोन वर्षांपासून कर्जबाजारी झाले.
त्यातच डीसीसी बँकेचे अधिकारी मनमानी करत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला वैताग आला आहे. त्यामुळे शेतकरी टोकाची भूमिका घेऊन बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार डीसीसी बँकेचे संचालक तसेच अधिकारी राहतील. असा ईशाराही यावेळी देण्यात आला आहे.
याचबरोबर डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी शेतकरी वर्गाची पत अडविल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. तेव्हा येत्या पंधरा दिवसांत पत मंजुर न झाल्यास डीसीसी बँकेच्या समोर उपोषणाला सामोरे जाऊ असा इशारा चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर यांनी दिला.
यावेळी दत्ता देसाई, मतेश सोज आदी उपस्थित होते.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …