
खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथील रमेश नामदेव गुरव (वय ४२) यांचे कुडाळ (महाराष्ट्र) येथे घराचे बांधकाम करते वेळी पायडवरून पडून मृत्यू झाला.
गेल्या दोन दिवसांपूर्वी बेकवाड येथून गवंडी कामासाठी तो कुडाळ (महाराष्ट्र) येथे गेला होता. कामावर असताना काम करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायडवरून काल सायंकाळी खाली कोसळल्याने त्याला वर्मी मार लागला. उपचारासाठी त्याला दवाखान्यात नेण्यात आले पण तो मरण झाल्याचे डॉक्टरनी सांगितले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच बेकवाड गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली व आई, नातवंडे असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta