
खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या पावसामुळे खानापूर तालुक्यातील हलशी-बिडी महामार्गावर 47 विद्युत खांब मोडून पडले आहेत.
याबाबत माहिती अशी की, गेल्या दोन दिवसापासून खानापूर तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. तालुक्यातील हलशी-बिडी महामार्गावर या वादळी पावसामुळे झाडे उन्मळुन पडली. काही भागात झाडाच्या फांद्या कोसळल्या त्यामुळे याभागातील उच्चदाबाच्या विद्युत वाहिनींचे 17 विद्युत खांब, डीपीचे 19 विद्युत खांब, टी सी स्टोरेजचे 4 विद्युत खांब, टी सी चे 7 विद्युत खांब असे एकूण 47 ते 50 विद्युत खांब कोलमडून पडले आहेत. त्याचबरोबर विद्युत ताराही तुटून पडल्याने खानापूर हेस्कॉम खात्याला लाखोचे नुकसान झाले आहे.
तसेच हलशी परिसरात रात्रीपासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे हलशी परिसरातील कुक्कुटपालन धोक्यात आला आहे. तेव्हा हलशी परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी हलशी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
खानापूर तालुक्यात लाईनमनची संख्या कमी आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित होऊन वेळेत वीजपुरवठा सुरळीत होणे कठीण होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta