
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावात होणाऱ्या दि. २ मे व दि. ३ रोजी शिव जयंती, बसव जयंती त्याचबरोबर रमजान ईद तसेच चर्च यात्रा आदी उत्सव शांततेत, उत्साहात पार पाडण्यासाठी येथील तालुका पंचायत सभागृहात शांतता कमिटीची बैठक गुरूवारी दि. २८ रोजी पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रविण जैन होते. तर व्यासपीठावर सीपीआय सुरेश सिंगे, बी॓ईओ लक्ष्मण यकुंडी नगराध्यक्ष मजहर खानापूरी आदी उपस्थित होते.
प्रारंभी तहसीलदार प्रविण जैन यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना तहसीलदार प्रविण जैन म्हणाले की, गेले दोन कोविडच्या, महामारीमुळे जयंती साजरी करता आली नाही. मात्र यावर्षी कोविडचा त्रासनसला तरी कोविडचे नियम पाळुन शिवजयंती, बसव जयंती, रमजान सन तसेच चर्च यात्रा साजरी करायची आहे.
यावेळी बोलताना भाजप युवा पंडित ओगले म्हणाले की, खानापूर शहरातून चार गाडे मिरवणूकीसाठी सज्ज केले जातात. मिरवणूकीची सुरूवात शिवस्मारक चौकातुन होऊन, महाजन खुट, चिरमुकर गल्ली, घाडी गल्ली, गुरव गल्ली मधुन मिरवणुकीची सांगता होते. तेव्हा मिरवणुकीच्यावेळी वीजपुरवठ्याचा त्रास होऊ नये यावर लाईनमनची सोय करावी. मिरवणूक शांततेत व शिस्तबद्धतेत होईल, असे सांगितले.
यावेळी रवी काडगी म्हणाले की, बसव जयंती निमित्त खानापूरातुन बसवेश्वराची पालखी काढण्यात येते. दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावेळी बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले जाते
याचवेळी रमजानही असून खानापूर इदगा मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ११ वाजता सांगता केली जाते. यावेळी हेस्काॅम खात्याने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी सुचना केली.
खानापूर शहरात राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्याच्या आवारात विद्युत रोषणाई करावी, अशी मागणी केली व जयंती शांततेत पार पाडाव्यात.
बैठकीला भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, एन. सी. तलवार, पंडित ओगले, श्री. बिचून्नावर आदी मान्यवरानी विचार व्यक्त केले. शेवटी आभार तहसीलदार प्रविण जैन यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta