
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जनजागृती व पुनर्बांधणी संदर्भात कुप्पटगिरी येथील हुतात्मा नागप्पा होसुरकर यांच्या गावी निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात खानापूर येथील राजा शिव छत्रपती स्मारकात उद्या दि. 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर खानापूरची ग्रामदेवता चौराशी देवी मंदिरात शपथबद्ध होणार आहेत त्यानंतर कुप्पटगिरी येथे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची निर्धार सभा घेऊन म. ए. समितीच्या एकजुटीचा संदेश पोहचविण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व सीमासत्याग्रही, खानापूर तालुका युवा समिती, आजी-माजी तालुका पंचायत जिल्हा पंचायत सदस्य, म.ए. समितीचे सर्व नेते, कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील व माजी सभापती मारुती परमेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta