Saturday , October 19 2024
Breaking News

खानापूर तालुक्यातील ७३ गावे स्मशानभूमीच्या प्रतिक्षेत

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका विकासापासून वंचित आहेत. अशा तालुक्यातील ७३ गावात अद्याप स्मशानभूमीची सोय नाही. एकीकडे जंगलाने व्यापलेला तालुका असुन जवळपास ३९ गावांत वनजमिनी असल्याने अडचणी येत आहेत. त्याचबरोबर ३४ गावातून सरकारी जमिनी उपलब्ध नाहीत. तेथे सहकारी जमिनी खरेदी करण्यात येणार आहे.
तेव्हा स्मशानभूमीसाठी जागा खेरदी करायची असेल अथवा राखीव ठेवायची समंती असल्यास तहसील कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन तहसीलदार प्रविण जैन यांनी केले आहे.
सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक गावात स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी व तालुका प्रशासन प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
परंतु तालुक्यातील काही गावात अडचणी येत आहेत.
सरकारी जमिनी उपलब्ध असलेल्या दोन एकर जागा स्मशानभूमीला देण्याचा अधिकार जिल्हा अधिकारीना देता येतो.
दोन एकरपेक्षा कमी गायरान जागा ‘ब’ खराब म्हणून वर्गीकरण असलेली सरकारी अतिक्रमण हटवुन ताब्यात असलेली जमीन, सरकारी जमीन कसत असलेल्या शेतकऱ्याचा अर्ज अपात्र ठरलेली जागा ताब्यात घेऊन ती देखील स्मशानभूमीसाठी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे.
खानापूर तालुक्यातील वरील कोणत्याही निकषानुसार जमीन उपलब्ध असल्यास ती स्मशानभूमीसाठी देण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्न करेल, त्यासाठी अशा गावातील लोकाना तहसील कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वरील निकषापैकी कोणताही निकष होत नसेलतर अशा ठिकाणी दरापेक्षा तीन पट्ट अधिक दर देऊन जमिनी खरेदी करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. तेव्हा संबंधित ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज करावेत असे आवाहन तहसीलदार प्रविण जैन यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Spread the love  बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *