खानापूर (प्रतिनिधी) : सकल मराठा समाजाच्यावतीने दि. १५ रोजी वडगाव येथील आदर्श विद्या मंदिराच्या मैदानावर होणाऱ्या गुरूवंदना कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी केले आहे.
यावेळी खानापूर शहराच्या विविध भागात, जांबोटी क्राॅस स्टेशन रोड, पारिश्वाड क्राॅस, येथील व्यापारी तसेच दुकानदाराना कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
मराठा समाज बहुसंख्येने शेतकरी असल्याने त्यांची शेती अबाधित राहावी. मार्गदर्शन व सहकार्य करणे व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, महिलांच्या उन्नती व्हावी. आदर्श समाजपुरूषाच्या समाधीस्थळांची जोपासना व्हावी. त्याच्या कार्याची समाजाला ओळख करून देणे आदी कार्ये जोपासण्यासाठी मराठा समाजाचे सातवे जगदगुरु वेंदाताचार्या मंजुनाथभारती स्वामी यांचा अधिकार ग्रहण सोहळा बेळगांव येथे १५ मे रोजी करण्यात आला आहे.
यावेळी मराठा समाजातर्फे भव्य सत्कार आयोजित केला आहे. यासाठी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने या कार्यक्रमात समाजकार्य म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील, सागर पाटील, विनायक गुरव, रवळू ठोंबरे, रवी मादार आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta